महराजगंज : गडौरा साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिले मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची समस्या सुटताना दिसून येत नाही. जून महिन्यात निचलौलच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी गडौरा कारखान्याची जमीन विक्री करून थकबाकी देण्याची कारवाई सुरू केली. मात्र, पाच जून रोजी आयोजित लिलावावेळी कोणीच बिलादार आला नाही.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गडौरा कारखान्याने २०२०-२१मध्ये महराजगंजमधील शेतकऱ्यांकडून ८ लाख १५ हजार क्विंटल ऊस खरेदी केली होती. त्यापोटी २६ कोटी १६ लाखांची ऊस बिले देणे अपेक्षित होते. मात्र, कारखाना व्यवस्थापन पैसे देवू शकले नाही. तर गेल्या हंगामातही, २०२१-२२ मध्ये शासनाने कारखान्याला ऊस वितरण मंजूर केले होते. शेतकऱ्यांकडून २ लाख १५ हजार क्विंटल ऊस खरेदी केला. त्यापोटी ७ कोटी ५० लाख रुपये देणे अपेक्षित आहे. एकूण १२ कोटी ६५ लाख रुपये थकीत आहेत. हे पैसे कारखान्याची जमीन विक्री करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.