ढाका : बांगलादेशातील व्यापारी सरकारने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने साखरेची विक्री करत आहेत. असे असताना त्यांना आता आणखी दरवाढ हवी आहे. ढाक्याच्या बाजारपेठेत लूज साखर १३५ रुपये किलो आणि पॅकबंद साखर १४०-१५० रुपये किलो दराने विकली जाते. विशेष म्हणजे वाणिज्य मंत्रालयाने महिन्यापूर्वी 120 रुपये आणि 125 रुपये किंमत निश्चित केली होती.
शुगर रिफायनर्स असोसिएशनने आता लूज साखरेची किंमत 140 रुपये (टका) आणि पॅकेज्ड साखरेची किंमत 150 रुपयांपर्यंत (टका) मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव दर आयोगाकडे पाठवला आहे, असे वाणिज्य सचिव तपन कांती घोष यांनी किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर सांगितले. सरकारने ठरवून दिलेल्या किमतींपेक्षा जादा दराने साखरेची विक्री होत असल्याच्या आरोपावर बचाव करताना ते म्हणाले की, जागतिक बाजारात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा बाजार स्थिर ठेवणे कठीण असते.
तपन म्हणाले की, बांगलादेशातील साखर कारखानदारांनी एक महिन्यापूर्वी सरकार ने साखर विक्रीसाठी निश्चित केलेल्या किमती मान्य केल्या होत्या, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्यामुळे नवीन दर लागू करू शकले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश ट्रेड कॉर्पोरेशनलाही जागतिक दरवाढीमुळे आंतरराष्ट्रीय निविदांद्वारे साखरेची आयात करता आळी नाही.