युपी: नोंदणीकृत व्यापाऱ्यांना मिळणार ५ लाखांच्या अपघात विम्याचा लाभ

मवाना : उद्योगाची नोदणी करणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला पाच लाख रुपयांपर्यंत अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे. यासोबतच व्यापारी इतर सुविधांचा लाभ मिळवू शकतील. कोणतेही नोंदणी शुल्क न भरता जिल्हा उद्योग केंद्रात व्यापाऱ्यांना नोंदणी करता येईल. कोणत्याही उद्योगाला एकापेक्षा अधिक नोंदणी करता येणार नाही. मवाना नगर पालिकेचे कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय नोंदणीचे आवाहन केले आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने नोंदणी प्रक्रियेसाठी सुविधा दिली आहे. उद्योग नोदणी अंतर्गत एक कायमस्वरुपी क्रमांक दिला जाणार असून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ऑनलाइन सर्टिफिकेट मिळेल. यात डायनॅमिक क्यूआर कोड असेल. सरकारच्या वेब पोर्टलवर आणि उद्योगाच्या विवरणापर्यंत यातून पोहोचता येईल. नोंदणी नुतनीकरणाची गरज नसेल. नोंदणी प्रक्रिया मोफत आहे.

नोंदणीनंतर पाच लाख रुपयांपर्यंतच्या अपघात विम्याचा लाभ व्यापाऱ्यांना मिळेल. उद्योगांना टर्न ओव्हरमध्ये सवलत, बँकांकडून कर्ज योजनांमध्ये सुविधा, शासकीय खरेदीत एमएसएमई कोटा आरक्षण, व्यापारी सरकारी वेबसाइटवर तक्रारी, समस्या नोंदवू शकतात असे लाभ मिळणार आहेत. नोंदणी प्रक्रिया व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल असे राजीव जैन यांनी सांगितले. यात प्लास्टिक मोल्डिंग, स्टील आयर्न, फर्निचर उत्पादन, फूड प्रॉडक्शन, डेअरी, बेकरी प्रॉडक्ट्स, रबर, आटा चक्की, ब्युटी पार्लर अशा अनेक उद्योगांचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here