ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षेत्रात जागतिक लीडर बनण्याची भारताला संधी

नवी दिल्ली : भारत लवकरच जागतिक तेल मागणीमुळे सर्वात मोठ्या ग्राहकाच्या रुपात चीनला मागे टाकून पुढे जाईल. मात्र, भारताकडे ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षेत्रात जागतिक लीडर बनण्याची संधी आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे (IEA) प्रमुख फतह बिरोल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, चीनने इलेक्ट्रिक वाहनांचा गतीने स्वीकार करताना पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट येत असल्याचे पाहिले आहे. जगातिल तिसरा सर्वाधिक ऊर्जा खप असलेल्या भारतात तेलाची मागणी वाढत आहे. यासोबतच सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून उत्पादित स्वस्त वीज देशाला हरित हायड्रोजन लीडरच्या रुपात पुढे येण्यास मदत करेल.

ते म्हणाले की, चीनमध्ये तेलाची मागणी घटण्याचे कारण, कार आणि बसचे विद्युतीकरण हे आहे. भारतात ४८,००० वाहनांच्या तुलनेत २०२२ मध्ये चीनमध्ये ईव्ही विक्री जवळपास दुप्पट होवून ६.१ दशलक्ष युनिटवर पोहोचली. यापूर्वी दिल्लीत जी २० परिषदेत बोलताना बिरोल यांनी सांगितले की, भारत जागतिक ऊर्जा विषयात केंद्र बनले असे मी सहा वर्षांपूर्वी म्हटले होते. आज, सहा वर्षानंतर मी सांगू इच्छितो की, भारत आज जागतिक ऊर्जा विषयात केंद्रस्थानी आहे. हे केवळ मोठ्या मागणीवर अवलंबून नसेल तर सौर तसेच नवीकरणीय स्त्रोतांपासून वीज उत्पादन आणि जीवाश्म इंधन परिवर्तनासाठी ऊस, धान्य, कृषी अवशेष यांच्यापासून उत्पादीत इथेनॉलसारख्या जैव इंधन वापरातील प्रगतीचे कारण आहे. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाने देशाला २ अब्ज डॉलरच्या तेल आयातीची बचत झाली आहे.
मला असे वाटते की भारत हरित हायड्रोजनमध्ये महाशक्ती बनण्यास तयार आहे. भारत २०७० पर्यंत कार्बन ऊत्सर्जन शुद्ध शून्य टक्के करण्याची क्षमता राखून आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here