मंझौला : प्रचंड ऊन आणि तप्त वातावरणामुळे ऊसासह विविध पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करून आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. याचा परिणाम नफ्यावर होणार आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नगदी पिके वाचविण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र बेगुसराय जिल्ह्यासह विभागात दिसून येत आहे. मान्सूनच्या आगमनास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी घेतलेली ऊसासह विविध पिके वाळू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांच्याकडून सिंचनासाठी शेतकऱ्यांना महागड्या दराने पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे ऊस, भाजीपाला यांसारख्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.