सहकारी साखर कारखाने, डिस्टिलरीच्या कामगारांना खुशखबर, डीए वाढणार

लखनौ : उत्तर प्रदेशातील ऊस समित्या तसेच त्यांची शिखर संस्था ऊस संघ तथा ऊस सेवा प्राधिकरणाच्या कर्चमाऱ्यांना आणि सहकारी साखर कारखाना संघाचे कारखाने तसेच डिस्टिलरीतील कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट मिळणार आहे. राज्याचे ऊस आयुक्त तथा निबंधक संजय भुसरेड्डी यांनी ही माहिती दिली. राज्यात आर्थिक रुपात सुदृढ सातव्या वेतनाचा ऊस समित्या तसेच साखर संघासोबतच सहाव्या आणि पााचव्या वेतन आयोग लागू असलेल्या ऊस समित्या, साखर कारखाना संघ, आसवनी तसेच जिल्हा आणि विभागीय, राज्य सेवा प्राधिकरणांना डीए वाढ मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना ऊस आयुक्त भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यातील सहकारी ऊस विकास समित्या, ऊस संघ तथा प्राधिकरणात कार्यरत ५,००० कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऊस समित्या, संघासह जिल्हा तथा विभागीय ऊस सेवा प्राधिकरणासही वाढीव डीएचा लाभ दिला जाणार आहे, असे लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तामध्ये म्हटले आहे.

ऊस आयुक्त भुसरेड्डी यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांसह आसवनींच्या १२ हजार कर्मचाऱ्यांनाही मनोबल वाढविण्यासआठी डीएच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. बेसिक पगारावर डीएची आकारणी केली जाते. समितीच्या कर्मचाऱ्यांना वाढती महागाई लक्षात घेऊन डीए दिला जातो. सहकारी क्षेत्राच्या आर्थिक मजबुतीसाठी आणि संस्थांच्या विकासासाठी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढीस मंजुरी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here