2023-24 या आर्थिक वर्षातील 17.06.2023 पर्यंतची प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी, निव्वळ संकलन 3,79,760 कोटी रुपये झाल्याचे दर्शवते, हे कर संकलन मागील आर्थिक वर्षाच्या 3,41,568 कोटींच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या तुलनेत 11.18% ची वाढ दर्शवते.
निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन (17.06.2023 रोजी) रु. 3,79,760 कोटीमध्ये कॉर्पोरेशन कर (सीआयटी) 1,56,949 कोटी रुपये (निव्वळ परतावा) आणि वैयक्तिक प्राप्तिकर कर (पीआयटी) यासह सिक्युरिटीज व्यवहार कराचा (STT) रु. 2,22,196 कोटी (निव्वळ परतावा) समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) मागील आर्थिक वर्षातील 3,71,982 कोटी रुपयांच्या तुलनेत 4,19,338 कोटी रुपये आहे, आर्थिक वर्ष 2022-23 च्या संकलनाच्या तुलनेत या संकलनाने 12.73% ची वाढ नोंदवली आहे
4,19,338 कोटी रुपयांच्या एकूण कर संकलनामध्ये 1,87,311 कोटी रुपयांचा कॉर्पोरेशन कर आणि 2,31,391 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकर समाविष्ट आहे.
17.06.2023 पर्यंत आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी अग्रीम कर संकलन रु. 1,16,776 कोटी आहे,हे कर संकलन आधीच्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या रु. 1,02,707 कोटींच्या अग्रीम कर संकलनाच्या तुलनेत 13.70% ची वाढ दर्शवते. 17.06.2023 रोजी नोंदवण्यात आलेल्या 1,16,776 कोटी रुपयांच्या अग्रीम कर संकलनामध्ये कॉर्पोरेशन कर (सीआयटी ) 92,784 कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी ) 23,991 कोटी रुपये समाविष्ट आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 17.06.2023 पर्यंत 39,578 कोटी रुपयांचा परतावा देखील जारी करण्यात आला आहे, मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील त्याच कालावधीत जारी केलेल्या 30,414 कोटी रुपयांच्या परताव्याच्या तुलनेत हा परतावा 30.13% ची वाढ दर्शवितो.
(Source: PIB)