रामेश्वर साखर कारखान्यावर मंत्री रावसाहेब दानवे यांचेच वर्चस्व

जालना : भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दानवे गटाच्या १८ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. टेंभूर्णी ऊस उत्पादक गटातील ३ जागांसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये आमदार संतोष दानवे यांचा समावेश आहे. उमदेवार अर्जांची छाननी आज (२० जून २०२३) होणार आहे. २१ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक अधिकारी संजय भोईटे, बी.आर.गिरी, डी.डी. बावस्कर, बी.टी.काकडे, एस.टी. रोठगे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here