अस्ताना : कझाकिस्तानने साखर उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. सरकार ने बीट आणि उसापासून साखरेचे उत्पादन २८३ हजार टनावरून ४९० हजार टनांपर्यंत वाढवण्याची योजना बनवली आहे, असे कृषी मंत्री येरबोल काराशुकेयेव यांनी सांगितले.कृषी मंत्री येरबोल काराशुकेयेव म्हणाले कि, अन्न सुरक्षा सुनिश्चितीचा एक भाग म्हणून सरकार ने उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. साखर उत्पादन वाढवण्यासाठी अक्सू शहरानजीक प्रती वर्ष १५० हजार टन साखर उत्पादन क्षमतेचा साखर कारखाना उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
यासाठी कॅलिक होल्डिंग, वायडीए ग्रुप, चॅम्पियन फूड्स, मुर्बन, रुसाग्रो, इनोक्स कॅपिटल यांसारख्या विदेशी कंपन्यांसोबत यासारख्या परदेशी कंपन्यासोबत चर्चा सुरु आहे. बीट आणि ऊस या दोन्हींपासून साखरेचे उत्पादन २८३ हजार टनावरून ४९० हजार टनांपर्यंत वाढवण्याची योजना असल्याचे मंत्री काराशुकेयेव यांनी सांगितले. ऊस लागवड क्षेत्र १२ वरून ३८ हजारापर्यंत वाढल्याने साखरेचे उत्पादन ३३ हजार टनावरून २५० हजार टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. देशांतर्गत साखर पुरवठा ५१ टक्क्यांवरुन ८३ टक्क्यांपर्यंत नेले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.