सोलापूर : अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील साखर कारखान्याने २०२२ – २०२३ गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचा प्रति टन ११३ रुपये प्रमाणे दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते – पाटील यांनी दिली.
जयसिंह मोहिते – पाटील म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील साखर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात १३० दिवसात १०,५६,७८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०,४२,५६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने- देशमुख, संचालिका स्वरूपाराणी मोहिते- पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, सुजाता शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.