कवर्धा : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दोन्ही साखर कारखान्यांच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जात नाही. या मुद्याबाबत छत्तीसगढ शेतकरी संघटनेने राज्य सरकारचे लक्ष वेधले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकरकमी बोनस जमा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
याबाबत भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या समृद्ध छत्तीसग किसान संघाने एकरकमी बोनस मिळावा अशी मागणी केली आहे. किसान संघाच्या प्रतिनिधींनी या विषयासंदर्भात कृषी उपसंचालकांना निवेदनही दिले. किसान संघाने न्याय योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळावा, अशी मागणी केली आहे.