हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सांगली, 22 अप्रैल : भविष्यात साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेतले पाहिजे. तरच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने टिकतील. भविष्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास कारखानदार आणि शेतकऱ्यांना कोणी ही वाचवू शकत नाही, असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी काल दिला. आणखीन ते म्हणाले साखर जास्त उत्पदान केले तर खड्यात जाल. भाजपचे उमेदवारांच्या प्रचारासाठी ते विटा (जिल्हा सांगली) येथे दौऱ्यावर आले आहेत, यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले,”टेंभू योजनेचे पाणी आले आहे. याचा सर्वांनाच आनंद वाटला. या पाण्यामुळे पिकांना जास्ती जास्त पाणी उपलब्ध होणार आहे. पण पाणी आले म्हणून नुसता ऊस लावून साखरेचे उत्पादन घेऊ नका. नाहीतर साखर कारखानदारी अडचणीत येतील पण शेतकरीही अडचणीत येणार आहेत असा धोक्याचा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिला.”