साखर कारखान्यात व्हॅक्यूम मशीनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू

हरदोई : हरदोईतील डीसीएम साखर कारखान्याच्या रुपापूर युनिटमध्ये काम करताना एका कामगाराचा व्हॅक्यूम मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. हा कामगार एक दशकापासून रुपापूर साखर कारखान्यात काम करीत होता. या युवकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डीसीएम साखर कारखान्याच्या रुपापूर युनिटमध्ये नंदराम विरभान हा गेल्या दहा वर्षांपासून काम करीत होता. उत्तराखंडमधील रुडकीच्या भेडकी गावातील रहिवासी असलेला नंदराम रुपापुर कारखान्यात कार्यरत होता. काम करताना तो तेथील व्हॅक्यूममध्ये अडकला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला. डीसीएम साखर कारखान्यात घडलेल्या या खळबळजनक घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याबाबत मृताच्या कुटूंबियांना कळविण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here