कर्नाटक: मायशुगर साखर कारखाना ऊस पुरवठ्यानंतर शेतकऱ्यांना १४ दिवसांत पैसे देणार

मांड्या : राज्य सरकारच्या मालकीचा म्हैसूर साखर कारखाना (मायशुगर) वर्ष २०२३-२४ साठी ऊस गाळप करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. मायशुगरचे व्यवस्थापकीय संचालक आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले की, कारखान्याच्या मशिनरी देखभाल, दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. आता ऊस तोडणीच्या कामासाठी मजुरांची व्यवस्था केली आहे. ते म्हणाले की, ऊस तोडणीनंतर २४ तासांत त्याचे गाळप करण्याची सोय करण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात तोडणीसाठी ३,५०० मजूर तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, स्थानिक स्तरावर १००० मजूर उपलब्ध झाले आहेत. इतर १००० मजूर बेळ्ळारी आणि पाचशे मजूर महाराष्ट्र, विजयपुरा आणि झारखंडमधून आले आहेत.

पाटील म्हणाले की, साखर कारखाना ऊस पुरवठा केल्यानंतर शेतकऱ्यांना १४ दिवसांत बिले देईल. त्यांनी शेतकऱ्यांना कार्यक्षेत्रातील खासगी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करण्याऐवजी बजाज मायशुगरला चांगला ऊस देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने गाळप सुरू करण्यासाठी मायशुगर कारखान्याला ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. ते म्हणाले, सद्यस्थितीत कारखान्याकडे निधीची कोणतीही कमतरता नाही. आणि कारखान्याकडे उपलब्ध असलेला १८,००० क्विंटल साखरसाठा विक्री करून आर्थिक स्थितीत सुधारणा केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here