जुलै महिन्यात निम्मे दिवस बँकांना सुट्टी असेल. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका १५ दिवस बंद राहतील. साप्ताहिक सुट्ट्यांसह जुलै महिन्यात मोहरम, गुरू हरगोविंद सिंह जयंती, अशुरा, केर पूजा असे विविध सण आहेत. आरबीआयने जारी केलेल्या यादीनुसार, आठ सुट्ट्या राज्यांच्या स्तरावर आहेत.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाच जुलै रोजी गुरु हरगोबिंद यांच्या जन्मदिनी जम्मू आणि श्रीनगरमध्ये तर सहा जुलै रोजी एबीपी एमएचआईपी दिवसानिमित्त आयजोलमध्ये बँका बंद राहतील. ११ जुलै रोजी केर पूजा आहे. या दिवशी त्रिपुरामध्ये बँकांना सुट्टी राहील. मोहरम २९ जुलै रोजी आहे. यादिवशी अनेक राज्यांत सुट्टी असेल. यात त्रिपुरा, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. यादरम्यान, बँकांमध्ये जाण्याऐवजी ग्राहकांनी ऑनलाइन बँकिंग, एटीएम, कॅश डिपॉझिट, मोबाईल बँकिंग अशा पर्यायांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.