MSM मलेशियाचा Asean Sugar Alliance मध्ये समावेश, साखर निर्यात वाढीवर भर

क्वालालंपूर : MSM मलेशिया होल्डिंग्स Bhd (MSM)ने memorandum of understanding (MoU) च्या माध्यमातून उद्योगाची प्रमुख संस्था Asean Sugar Alliance (ASA) ची सदस्य बनली आहे. या आघाडीच्यामध्ये सहभागी असलेल्या इतर सदस्यांमध्ये कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपाइन्स, थायलंड आणि व्हिएतनाममधील साखर उद्योगातील रिफाइनर्सचा समावेश आहे.

याबाबत MSM समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैयद फैजल सैयद मोहम्मद यांनी सांगितले की, देशातील पहिली साखर निर्याता आणि आशियातील सर्वाधिक क्षमतेच्या साखर रिफायनरीपैकी एक असलेल्या कंपनीने मूल्यवर्धित डाउनस्ट्रीम विकसित केले आहे. या आघाडीचा हिस्सा बनल्याने MSM आपला दृष्टिकोन आणि प्रगतीशील व्यापार मॉडेलचा विस्तार करीत असल्याचे दिसते.

त्यांनी सांगितले की, आगामी काळात एमएसएम बाजारात निर्यात वाढविण्याच्या हेतूने काम करेल. सध्याची निर्यात ६ टक्क्यांवरून बाजार हिस्सेदारी १२-१५ टक्यांपर्यंत वाढवली जाणार आहे.

आशिया प्रशांत महासागरातील १७ देशांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये आपला निर्यात बाजार, नव्या आउटरिचला आफ्रिकेसारख्या हायपर विकासशील महाद्विपांपर्यंत विस्तारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अलिकडेच MSM शुगर रिफाइनरी (जोहोर), (MSM जोहोर) ने आपल्या तांत्रिक बदलांच्या कार्यक्रमाची पूर्तता केली आहे. कंपनी आपल्या युटिलायझेशन फॅक्टरचा वापर करेल. कंपनीने नमूद केले आहे की एमएसएम जोहोरला वार्षिक चार दशलक्ष टन निर्यात बाजारासह आशिया पॅसिफिक प्रदेशात भौगोलिक-सामरिक फायदा होणार आहे.

त्यांनी सांगितले की, ASA च्या सदस्यत्वामुळे MSM चे साखर उद्योगातील भागिदारांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. त्याचा साखर व्यापार, उत्पादन, विक्रीत उपयोग होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here