मान्सूनच्या आगमनानंतर डोंगराळ राज्यांसह काही राज्यांमध्ये पूर आणि इतर समस्या भेडसावत आहेत. मुंबईत जोरदार पावसानंतर अनेक भागात पाणी साठण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. बुधवारी मालाड विभागात एका व्यक्तीच्या अंगावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला. कौशल दोशी असे त्याचे नाव आहे. पावसामुळे हे झाड कोसळले.तर गुजरातमधील दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या शक्यतेने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
न्यूज २४ऑनलाइनच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. परिणामी अनेक ठिकाणी पाणी साठले. त्यातून झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन दिवसांत पुराच्या पाण्यात दोघेजण वाहून गेले. त्यातील एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
डोंगराळ हिमाचल प्रदेशात बुधवारी जोरदार पावसानंतर भुस्खलन झाले आहे. राज्यातील शंभरहून अधिक रस्ते बंद झाल्याचे प्रशासनाने सांगितले. उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने ५ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच डेरहाडूनसह भागात यलो अलर्ट जारी केला आहे. गुजरातमध्ये आज भरूच, सुरत, नवसारी, वलसाड, दमण, दादरा नगर हवेली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण गुजरातमधील नवसारी आणि वलसाडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.