नवी दिल्ली : आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये भारतीय गैर-बासमती तांदळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे निर्यातही वाढल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर २०२२ पासून पांढऱ्या व वाफवलेल्या तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के सीमा शुल्क आकारले जाते. त्यामुळे त्याची किंमत वाढली. तरीही निर्यात सुरू आहे. कारण प्रतीस्पर्धी देश थायलंड आणि व्हिएतनाम यांचे दर यापेक्षा खूप जास्त आहे.
इव्हेस्टिंग डॉट कॉमवरील वृत्तानुसार, अपेडा या कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडील आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात १४.२० लाख टनांपर्यंत वाढली. त्यामुळे ४३४९ दशलक्ष कोटी रुपये उत्पन्न मिळाले. एप्रिल २०२२ मध्ये १३.५३ लाख टन सामान्य तांदळाच्या शिपमेंटमधून ३६७५ कोटी रुपये किंवा ४८.२० दशलक्ष डॉलर उत्पन्न मिळाले आहे. तांदळाची बोर्ड सरासरी युनिट निर्यात ऑफर किंमतदेखील ३५७ डॉलर प्रती टनवरून ३७३ डॉलर प्रती टनापर्यंत वाढली. परंतु त्याचा तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झालेला नाही.