साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादन क्षमतेचा विस्तार सुरू

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सांगितले की, साखर कारखाने सध्याच्या क्षमतेचा विस्तार करीत आहेत. आणि अनेक कारखाने इथेनॉल उत्पादनासाठी नव्याने प्लांट्स सुरू करीत आहेत. ते म्हणाले की, इथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखान्यांची स्थापित क्षमता सध्या ७३० कोटी लिटर प्रती वर्ष आहे. जवळपास ८५ टक्के इथेनॉल पुरवठा साखर कारखान्यांद्वारे केला जातो. निती आयोगाच्या अनुमानानुसार २० टक्के मिश्रणासाठी १००० कोटी लिटर पेक्षा अधिक इथेनॉलची गरज भासेल. ते म्हणाले की, आम्ही सरकारकडे साखर कारखन्यांकडून येणारे प्रमाण सांगण्याची मागणी केली आहे.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, झुनझुनवाला म्हणाले की, या साखर हंगामात साखरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. साखर कारखान्यांनी ६.१ मिलियन टन कोटा पूर्ण केला आहे. साखरेची आंतरराष्ट्रीय किंमत ५३ रुपये प्रती किलो आहे. तर भारतात एक्स मील किंमत ३४.५ ते ३६ रुपये प्रती किलो आहे. इथेनॉल कार्यक्रम दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. आम्ही मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहोत आणि इंधन कंपन्या इथेनॉल घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here