सातारा जिल्ह्यात पावसाअभावी ऊस पीक धोक्यात

सातारा : पावसाने पाठ फिरवल्याने सातारा जिल्ह्यात ऊस पीक धोक्यात आले आहे. विशेषतः कराड तालुक्यातील दक्षिण विभागातील छोटी धरणे, पाझर तलाव आणि नद्याही कोरड्या पडल्याने शेतकरी उसाला पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे डोंगर आणि माळरानावरील उसाला मोठा फटका बसत आहे. ऊस वाळत असून जुलै महिना सुरु झाला तरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावला आहे. पावसाअभावी वाळलेला ऊस शेतकरी जनावरांना कापून घालत आहेत.

मागील आठवड्यापासून सातत्याने ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र असे असले तरी अद्याप म्हणावा तसा दमदार पाऊस झालेला नाही. केवळ हलक्या सारी कोसळत असून उसासाठी दमदार पावसाची गरज आहे. भुईमूग, सोयाबीन यासह कडधान्याच्या पेरण्याही रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याचे संकट कोसले आहे. पाऊस नसल्याने डोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here