मध्य प्रदेशातील बोरेगावमध्ये Gulshan Polyols ने ५०० KLPD धान्यावर आधारित इथेनॉल प्लांटमध्ये व्यावसायिक कामकाज सुरू केले आहे. कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड आणि नायरा एनर्जी लिमिटेडलासुद्धा इथेनॉल पाठवले आहे.
देशभरात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील अनेक कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. इथेनॉल पारंपरिक इंधनाच्या तुलनेत पर्यावरणासाठी सर्वात चांगले म्हटले जाते. त्यामुळे सरकार याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे.
अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंरराष्ट्रीय सहकार दिवसाच्या निमित्ताने नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित १७ व्या भारतीय सहकारी काँग्रेसमध्ये बोलताना सांगितले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. गेल्या नऊ वर्षात साखर कारखान्यांनी ७०,००० कोटी रुपयांचे इथेनॉल विक्री केली आहे.