तीन जुलै ठरला जगातील सर्वाधिक उष्ण दिवस, अंटार्टिकमध्ये तापमानाने मोडला विक्रम

नवी दिल्ली : उत्तर भारताला सध्या उकाड्याने हैराण व्हावे लागले आहे. यादरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्मेंटल प्रेडिक्शनकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, सोमवार म्हणजे ३ जुलै हा जगातील आजवरचा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. अहवालानुसार, सोमवारी जागतिक स्तरावर आजवरचे सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाली आहे. यूएस सेंटरने म्हटले आहे की, उष्णतेच्या लाटेमुळे जागतिक सरासरी तापमान १७.०१ डिग्री सेल्सिअस (६२.६२ फेरनहाइट) पर्यंत पोहोचले. ऑगस्ट २०१६च्या १६.९२ C (६२.४६F) चा उच्चांक याने मोडला आहे.

न्यूज नेशन टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भारतच नव्हे तर जगातील बहुसंख्य देश उष्णतेने हैराण झाले आहेत. दक्षिण अमेरिकेतही गेले अनेक आठवड्यांपासून भीषण उष्णता आहे. चीनमध्ये तापमान ३५C (९५F) पेक्षा अधिक वाढले आहे. यासोबतच येथे उष्णतेच्या लाटेचा परिणामही दिसत आहे. दुसरीकडे उत्तर आफ्रिकेतील तापमान ५० C (१२२F) जवळ पोहोचले आहे. याशिवाय, अंटार्टिकामध्ये जेथे नेहमी बर्फ असते, तेथेही तापमानाचा उच्चांक मोडला आहे.
अंटार्क्टिकामध्ये सध्या थंडी पडत आहे. परंतु येथे असामान्यपणे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. अर्जेंटाइन बेटांमधील युक्रेनच्या व्हर्नाडस्की रिसर्च बेसमध्ये अलीकडेच ८.७ °C (४७.६F) तापमान नोंदवले गेले. जे जुलै महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here