मुजफ्फरनगरमध्ये शेतकऱ्यांमध्ये पसरला ऊसाचा गोडवा

मुजफ्फरनगर : नकदी पिक असलेल्या ऊसाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात ऊस पिकाचे क्षेत्र ४८ हजार हेक्टरने वाढले आहे. ऊसाचे सरासरी उत्पादनही २०३ क्विंटल प्रती हेक्टर वाढले आहे. यासोबतच शेतकऱ्यांची बिले १४०० कोटी रुपयांनी वाढली आहेत. ऊस शेतीतून चांगला फायदा मिळत असल्याने शेतकरी संख्येत वाढ होत आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात शेतीचे क्षेत्रफळ दोन लाख हेक्टर आहे. तर सव्वादोन लाख शेतकरी आहेत. २०१४-१५ मध्ये ऊस लागवड क्षेत्र एक लाख २५ हजार ४१९ हेक्टर होते. २०२३-२४ मध्ये हे लागवड क्षेत्र वाढून एक लाख ७३ हजार हेक्टर झाले आहे. २०१४-१५ मध्ये जिल्ह्याचे सरासरी ऊस उत्पादन ७२९.४४ क्विंटल प्रती हेक्टर होते. आता ते २०२२-२३ मध्ये ९३३.०८ क्विंटल प्रती हेक्टर झाले आहे. दहा वर्षात ऊस उत्पादन २०३ क्विंटल प्रती हेक्टरने वाढले आहे.

जिल्हा ऊस अधिकारी संजय सिसौदिया यांनी सांगितले की, २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऊस बिलांमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, ही दोन वर्षे वगळता सरासरी ऊस बिलात वाढ झाली आहे. २०१५-१६ आणि २०१९-२० मध्ये सुद्धा सरासरी ऊस उत्पादनात वाढ झाली नाही. मुझफ्फरनगरचे शेतकरी जागरुक आहेत. त्यामुळे त्यांचा कल ऊस शेतीकडे वाढला आहे. सध्या उसाच्या ०२३८ या प्रजातीवर किड, रोगांचा फैलाव झाला आहे. शेतकरी उसावरील या रोगांवर औषध फवारणी करीत आहेत. त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here