युपी: हत्तींच्या कळपाकडून ऊस पिक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल

बहराइच : सुजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारीकोट पंचायत क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळी हत्तींनी धुमाकूळ घातला. जंगलातून बाहेर आलेल्या हत्तींनी जवळपास पाऊण एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला. शेतकऱ्यांनी फटाके फोडले, ट्रॅक्टरच्या हॉर्नचा वापर केला. मात्र, हत्तींच्या कळपांनी जवळपास दोन तास धुमाकूळ घातला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किरीकोटमधील मजरा जमुनिहा गावातील शेतकरी निर्मल सिंह यांच्या शेतात मंगळवारी सायंकाळी जंगली हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला. शेताला असलेले कुंपण तोडून हत्ती आत घुसले आणि त्यांनी उसाचा फडशा पाडला. यांदरम्यान, हत्तींना रोखण्यासाठी फटाके फोडण्यात आले. ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. मात्र, हत्तींच्या उपद्रवावर काहीच परिणाम झाला नाही. जवळपास दोन तास दहा हत्ती ऊसाच्या शेतात होते, असे शेतकरी निर्मल यांनी सांगितले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here