वाढत्या तापमानामुळे भारतात २०४० पर्यंत गव्हाच्या उत्पादनात ५ टक्के आणि २०५० पर्यंत १० टक्के घट होऊ शकते. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासामध्ये गहू आणि ज्वारीच्या उत्पादनावर होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांची तुलना करण्यात आली. यातून संशोधकांना असे आढळून आले की वाढत्या तापमानाचा गव्हाप्रमाणे ज्वारीच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही. २०२३० पर्यंत, गव्हासाठी पाण्याची गरज नऊ टक्क्यांनी वाढू शकते, तर ज्वारीसाठी पाण्याची गरज या काळात केवळ सहा टक्क्यांनी वाढेल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि शाश्वत विकास या विषयाचे संशोधक प्रोफेसर रुथ डेफ्रिज यांनी हा आढावा घेतला आहे. त्यांच्या मते, योग्य संतुलन राखल्यास, गहू ज्वारी आणि रब्बी पिकांसाठी हवामानाशी जुळवून घेणारा पर्याय देऊ शकतो. कोरड्या परिस्थितीत ज्वारी किंवा बाजरी पिकविण्याच्या क्षमतेमुळे ही पिके व्यवहार्य मानली जातात. यास गव्हाच्या तुलनेत सुमारे दोन ते तीन टक्के कमी पाणी लागते. दुसरीकडे गव्हाचे जास्त उत्पादन म्हणजे जादा पाण्याची गरज भासते.
सध्या गव्हावर वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम होत आहे. या अभ्यासानुसार, १९९८ ते २०२० यांदरम्यान भारतात गव्हाचे उत्पादन सुमारे 4४२ टक्क्यांनी वाढले आहे. तर ज्वारीचे उत्पादन दहा टक्क्यांनी घटले आहे. पीक लागवड क्षेत्रात २१ टक्क्यांची घट झाल्याने उत्पादनात ही घट झाली आहे. गव्हाइतके संशोधन न झाल्याने ज्वारीचे उत्पादन खालावत गेल्याचे संशोधनात प्रा. रुथ डेफ्रिज यांनी म्हटले आहे.