नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात पावसाने वातावरण बदलून गेलले आहे. हवामान बदलल्याने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पाऊस लोकांसाठी अडचणीचा ठरू लागला आहे. गुरुवारी जोरदार पावसाच्या शक्यतेने हवामानशास्त्र विभागाने काही राज्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुसरीकडे गोवा आणि दक्षिण गोव्यात आयएमडीने रेड अलर्ट दिला.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी कोकण, गोवा, महाराष्ट्र, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. याशिवाय इतर राज्यांपैकी आसम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिशा, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा – चंडीगढ़, दिल्ली, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेशात ठिकठिकाणी जोरदार पाऊस कोसळू शकतो.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आगामी २४ तासात केरळ, कर्नाटक किनारपट्टी, गुजरातसह उत्तर पूर्व भारत, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार द्वीपसमुह, लक्षद्वीप, कर्नाटक, तेलंगणा आंध्र प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पावसानंतर दिल्लीसह इतर राज्यांना पाणी साठण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. महाराष्ट्रातही अशीच स्थिती होती. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. गोव्यामध्ये पावसाने थैमान घातल्याचे चित्र होते. मुसळधार पावसात गेल्या २४ तासास एक महिला पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा प्रकार घडला.