टोमॅटोनंतर आता तांदूळही महागला, दर ११ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर

नवी दिल्ली : जगातील प्रमुख सहा उत्पादक देशांतील अल निनोचा परिणाम तांदळावर दिसू लागला आहे. या प्रमुख अन्नधान्याची किंमत आता ११ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. यात आणखी तेजी येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अल निनोटा प्रभाव केवळ एखाद्या देशापर्यंत मर्यादीत नाही. हा सर्व उत्पादक देशांवर विपरीत परिणाम करणारा आहे. फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनचा (एफएओ) जागतिक तांदूळ मूल्य सूचकांक ११ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर आहे. अमेरिकन कृषी विभागाने बांगलादेश, चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविल्यानंतर ही स्थिती सामोरी आली आहे.

अभ्यासकांच्या मते अल निनोमुळे सर्व प्रमुख तांदूळ उत्पादक देशांमध्ये उत्पादनात घट दिसून येईल. त्यामुळे किंमत गतीने वाढेल. अलिकडेच तांदळाचे प्रमुख उत्पादक देश चीन आणि भारतामध्ये साठ्यात घसरण झाल्याने चालू आर्थिक वर्षात जागतिक स्तरावर तांदळाचा साठा घसरून ६ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर, १७ कोटी टनापर्यंत येईल असे स्पष्ट झाले आहे. इटली आणि स्पेनमध्ये तीव्र दुष्काळानंतर युरोपमधील उत्पादन १९९५-९६ नंतर सर्वात कमी होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here