इंडियन ऑईलची बायोफ्युएल उत्पादन क्षमता वाढीसाठी प्राज इंडस्ट्रिजसोबत भागीदारी

नवी दिल्ली : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (इंडियन ऑइल) आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड (प्राज) ने भारतामध्ये बायोफ्युएल उत्पादन क्षमता आणखी मजबूत करण्यासाठीच्या योजना पुढे नेण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या एमओयू अंतर्गत विविध जैव इंधनामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ), इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), बायोडिझेल आणि बायो – बिटुमेनचा समावेश आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन्ही कंपन्यांनी या उद्देशाने ५०:५० संयुक्त उद्योग उभारणीविषयी एक सामंजस्य करार केला आहे.

इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले की, प्राजच्या सहयोगाने इंडियन ऑईलच्या हरित ऊर्जा संक्रमण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. २०४६पर्यंत शून्य शुद्ध उत्सर्जनाचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि हरित ऊर्जा क्षेत्रात नेतृत्व करण्याचा आमचा संकल्प अधिक दृष्ट होणार आहे.
वैद्य म्हणाले की, स्वदेशी जैव इंधन भारताला डिकार्बोनायझेशनचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल. तेलाच्या आयातीवरील अवलंबीत्व यातून कमी होवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

प्राज इंडस्ट्रिजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले की, इंडियन ऑईल आणि प्राज आधीच भारताच्या हरित भविष्यासाठी ऊर्जा परिवर्तन क्षेत्रात सुविधा वाढविण्यासाठी भागिदारी करीत आहेत. इंडियन ऑइलच्या पानीपत कॉम्प्लेक्समध्ये देशातील पहली उन्नत जैव ईंधन रिफायनरी प्राजच्या स्वामीत्वाखालील २ जी तंत्रावर आधारीत आहे. मे महिन्यात इंडियन ऑइल आणि प्राजने एअर एशिया इंडियासोबत ‘स्वदेशी’ सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलसाठी भागीदारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here