हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनीमंडी
महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणूक होत आहे. त्यातले तीन टप्पा झाले असले असून, एक टप्पा २९ एप्रिलला होता आहे. या तीन टप्प्यांत अनेक ठिकाणी ऊस दर आणि साखरेचा विषय चर्चेला आला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रावादीने या मुद्द्यांवरून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर महाराष्ट्रातील एका जाहीर सभेमध्ये म्हणाले, ‘काँग्रेस राष्ट्रवादीच्या आधीच्या सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आम्ही तसे करणार नाही. आम्ही कारखान्यांना इथेनॉल उत्पादन सक्तीचे करू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून देवू. इथेनॉल उत्पादनामुळे तिहेरी फायदा होणार आहे. त्यामुळे उसाला चांगला भाव मिळेल आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे पेट्रोलचे दर कमी होतील. तसेच देशाला इंथन आयातीवर अवलंबून रहावे लागणार नाही.’
यापूर्वी केवळ ४० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होत होती. आता तोच आकडा १४० कोटी लिटरवर गेला आहे. आधीच्या सरकारला हे माहिती होते. पण, त्यांनी या उद्योगातील मलई खाण्याच्या नादात कधीच त्याचा विचार केला नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात आदिवासींच्या जमिनींचे हक्क कायम राहतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकारमुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे, असाही आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
Promises are for election only, prompt execution is doubtful.