पॅनकार्डवरील चुकीचे नाव, जन्मतारखेमध्ये अशी करा Online दुरुस्ती

नवी दिल्ली : इन्कमटॅक्स जमा करणे आणि बँकेत खाते उघडण्यासाठी, गुंतवणुकीसाठी पॅनकार्डची गरज भासते. मात्र, यामध्ये काही चूक झाली तर तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या पॅनमधील माहिती नेहमी अपडेट ठेवावी.

पॅन कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी, तुम्ही प्रथम NSDL PAN किंवा UTIITSL PAN च्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला माहिती अपडेट करण्यासाठी अर्ज करावा लागेल. पॅनवरील माहिती अपडेट करण्यासाठी १५ ते ३० दिवस लागतात.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html अथवा UTIITSL ची अधिकृत वेबसाईट https://www.pan.utiitsl.com/PAN/csf.html वर संपर्क साधावा. यानंतर तेथे तुम्हाला चेंज/ करेक्शन पॅन डेटा या लिंकवर क्लिक करावे लागेल.

नंतर या अर्जात ॲप्लिकेशन टाइपमधील पर्यायानुसार, सध्याच्या पॅन डेटामध्ये सुधारणा, बदल / पॅन कार्ड रिप्रिंट असे पर्याय निवडावे लागतील. त्यानंतर योग्य प्रकार निवडून पॅन क्रमांक सबमिट करावा. त्यानंतरच्या नव्या पेजवर जी माहिती अपडेट करायची आहे, त्याचे लेखन करावे.

त्यानंतर त्याच्याशी संबंधीत कागदपत्रे आणि शुल्क भरावे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. यावेळी तुम्हाला एक ॲप्लिकेशन क्रमांक दिला जाईल. त्याच्या मदतीने तुम्ही अर्जाचे ट्रॅकिंगही करू शकता.

पॅन कार्ड अपडेटसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, वाहन चालविण्याचा परवाना या कागदपत्रांचा आधार घेता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here