महाराष्ट्र: कमी पावसामुळे जुलैमध्ये जलाशयांमध्ये केवळ २.५ टीएमसी पाणी वाढले

पुणे : खडकवासला विभागातील चार धरणांमध्ये गेल्या दहा दिवसांत २.५ टीएमसी पाणी वाढले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ५.१ टीएमसी पाणी वाढले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुलैमध्ये पाऊस सर्वात कमी झाल्याने धरणांमधील पाणी वाढण्याचा वेगही मंदावला आहे.

राज्याच्या सिंचन विभागाकडील आकडेवारीनुसार, चारही धरणांमध्ये आता ७.७ टीएमसी पाणी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत याच कालावधीत ७.६ टीएमसीपेक्षा कमी पाणी आहे. सध्याचा संयुक्त साठा पुढील पाच महिन्यांसाठी शहराच्या पाण्याची सोय करू शकतो. मात्र, आताही हा साठा ५० टक्क्यांनी कमी आहे. जर पाऊस कमी झाला तर धरणांतील जलप्रवाह आणखी कमी होऊ शकतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळला होता. त्यामुळे पाणीसाठा निम्यापेक्षा अधिक झाला. यावर्षी जूनच्या अखेरच्यासप्ताहात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. गेल्या १० दिवसांत पाऊस कमी पडला आहे.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, धरण क्षेत्रात खूप कमी पाऊस झाला आहे. खडकवासलामध्ये सोमवारी पाऊस झाला नाही. पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये ५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. किरकोळ पावसाने पाण्याच्या स्तरात फारशी वाढ होत नाही. पुढील आठवड्यात धरणांतील पाणीसाठा आणि पाणी पुरवठा यांचा आढावा घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here