शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी साधलेल्या ‘टायमिंग’ची राज्यात चर्चा

कोल्हापूर : रविवारी (९ जुलै २०२३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी विवाहबंधनात अडकला. सौरभचा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला. मोजक्या लोकांमध्ये राजू शेट्टींनी सौरभच लग्न उरकलं अन् काही तासांतच तिथून थेट कार्यकर्त्याच्या लेकाच्या लग्नाला हजेरी लावली. तिथे जेवण देखील केले. या घटनेतून राज्याने राजू शेट्टी यांच्यातील ‘बाप’ आणि कार्यकर्त्यांचा ‘पालक’ या दोन्ही बाजू बघितल्या. शेट्टी यांची कार्यकर्त्यांशी किती घट्ट नाळ जुळली आहे, हे पहायला मिळाले.

माजी खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याचा विवाह सोहळा रविवारी अगदी साधेपणाने पार पडला. सौरभचे लग्न रविवारी असतानाच त्यांचे कार्यकर्ते आणि संघटनेचे जिल्हा सरचिटणीस असलेले शिवाजी पाटील यांचा मुलगा विनय याचा विवाह देखील वडगाव येथे त्याचवेळेस होता. या लग्नात राजू शेट्टी यांनी हजेरी लावावी, असा आग्रह शिवाजी पाटील यांचा होता. मात्र एका बाजूला आपल्या मुलाचं लग्न आणि दुसऱ्या बाजूला आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाचं लग्न अशा कात्रीत राजू शेट्टी सापडले होते.

शेट्टी यांनी आपल्या मुलालं लग्न उरकून, पाहुण्यांना भेटून गडबडीतच गाडीत बसले आणि थेट वडगावमध्ये पोहोचले. पाटील यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावत वधू-वर यांना शुभाशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवून त्यांनी जेवणही केले. शेट्टी यांच्या या कृतीने उपस्थित लोक ही भारावून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here