सहकार शिरोमणी’च्या चेअरमनपदी पाचव्यांदा कल्याणराव काळे यांची निवड

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कल्याणराव काळे यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली. व्हाईस चेअरमनपदी भारत कोळेकर यांची निवड झाली. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर काळे म्हणाले कि, १५ दिवसात शेतकरी, कामगारांची सर्व थकीत देणी भागविण्यासाठी कटिबद्ध आहे.

११ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या निवडीसाठी कारखान्यावर नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारत वाघमारे उपस्थित होते. चेअरमनपदासाठी कल्याणराव काळे आणि व्हाईस चेअरमनपदासाठी भारत कोळेकर यांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक मालन काळे, युवराज दगडे, दिनकर कदम, नागेश फाटे, अमोल माने, राजाराम पाटील, राजेंद्र शिंदे, अरुण नलावडे, संगीता देठे, कार्यकारी झुंजार आसबे आदीसह अधिकारी, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here