सोलापूर : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये आगामी २०२३ – २०२४ गळीत हंगामासाठी रोलर मिल पूजन कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात डागडुजी आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.
कारखान्यातर्फे ऊस तोडणी आणि वाहतुकीचे करार करण्यात येत आहेत. कारखाना प्रशासनाने येत्या गाळप हंगामात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहन संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते -पाटील यांनी केले आहे. यावेळी व्हाईस चेअरमन शंकरराव माने- देशमुख, प्रकाशराव पाटील, लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, गोविंद पवार, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.