बरेली : बरेलीतील साखर कारखान्यात बॉयलरवरुन कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. हा युवक बॉयलरवर चढून तेथे काही काम करीत होता. तर इतर कर्मचारी खालीच होते. जखमी युवक नन्हे याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी आक्रोश केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, औरंगाबाद येथील नन्हे (वय ३२) हा युवक नवाबगंजमधील ओसवाल साखर कारखान्यात काम करीत होता. गुरुवारी काम करत असताना बॉयलरवरुन त्याचा पाय निसटला. आणि तो कोसळला. सुमारे २० ते २५ फूट उंचीवरून कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.