आता पिकांची सॅटेलाईटद्वारे होणार पाहणी

फारुखाबाद : शेतकऱ्यांच्या पिकांची आता सॅटेलाइटद्वारे पाहणी होणार आहे. सरकारच्या पोर्टलवर पिकांची ऑनलाइन नोंदणी केली जाईल. ३४९ पथकांकडून सर्व्हे करून पिकांचे जीओ टॅगिंग केले जाईल. यापासून सरकारला उत्पादनाची माहिती दिली जाईल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, अशा काळात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होते. कधी तरी दुष्काळाचा फटका बसतो. पिक विमी अंतर्गत शेतकऱ्यांना हप्ता भरूनसुद्धा नुकसान भरपाई मिळत नाही. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी हेलपाटे मारावे लागतात. या सर्व गोष्टींपासून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. सरकार ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत पिकांचा डिजिटल सर्व्हे करणार आहे. महसूल आणि कृषी विभागाचे शेतकरी प्रत्येक ठिकाणी जावून सर्वेह करतील. त्याला जीओ टॅग केले जाईल. त्यानंतर पिकांची माहिती पोर्टलवर दिसणार आहे.
योजनेच्या अंमलजबावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती काम करणार आहे. प्रकल्प अधिकारी आणि कृषी उप संचालक हे सचिव असतील. जिल्हा कृषी अधिकारी, उद्यान अधिकारी, ऊस अधिकारी, तहसील दार आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. उपसंचालक अनिल कुमार यादव यांनी सांगितले की या प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. एका आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेस प्रारंभ केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here