गाजीपुर: किसान सभेच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची बैठक हंसराजपूरमध्ये नसरुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्य पर्यवेक्षक बाबूराम यादव उपस्थित होते. संघटनेचे जिल्हा मंत्री जोगिंदर यादव यांनी गेल्यावेळच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नंदगंज साखर कारखाना आणि बडौदा कताई साखर कारखाना सुरू करण्यात यावेत यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष बाबूराम यादव यांनी विज आणि किमान समर्थन मूल्याबाबत शेतकऱ्यांना संघटित करून आंदोलन सुरू करण्याविषयी चर्चा केली. धनदांडग्यांकडून सुरू असलेल्या लुटीबद्दल ९ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाअंतर्गत जिल्हा मुख्यालयावर धरणे धरण्याविषयी चर्चा करण्यात आली. ऊस, बटाटा, भाजीपाल्याच्या कोल्ड स्टोअरेजसह नंदगंज साखर कारखाना आणि बडौदा कताई साखर कारखाना सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राव विरेंद्र, विजय बहादुर सिंह, मारकंडे प्रसाद, डॉ. सीताराम यादव, भोला यादव, जोगिंदर यादव आदी उपस्थित होते.