बंद रिगा साखर कारखान्यामुळे कामगार बनले बेरोजगार, शेतकरी कर्जदार

सीतामढी : सीतामढी आणि शिवहर परिसरासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रिगा साखर कारखाना दीर्घकाळ आधार ठरला होता. मात्र, कारखाना प्रशासनाची मनमानी, सरकारचे दुर्लक्ष यातून कारखाना तोट्यात गेला. साखर कारखाना प्रशासनाने शेकडो शेतकऱ्यांना केसीसीचे कर्ज देवून त्यांना कर्जदार बनवले. कारखाना प्रशासनाविरोधात सतत तक्रारींची नोंद झाली. यादरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये सीएमडी ओ. पी. धानुका यांनी कारखाना चालवण्यास नकार दिल्याने त्याला कुलूप ठोकले गेले. कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे.

न्यूज१८मधील वृत्तानुसार, कारखाना जर पुन्हा सुरू झाला तर ते शेतकऱ्यांना आधार ठरू शकेल. ऊस शेतीला प्रोत्साहन मिळेल. सध्या कारखान्याचे अधिग्रहण ओमप्रकाश धानुका यांच्याकडे आहे. सुरुवातीला त्यांनी कारखान्याची उत्पादन क्षमता ६० हजार क्विंटलपर्यंत पोहोचवले. मात्र, २०२० मध्ये कारखान्याच्या व्यवस्थापनाला उतरली कळा लागली. तेव्हापासून कारखाना बंदच आहे.

सुरुवातीला या कारखान्याची गाळप क्षमता ३५ ते ४० लाख टन होती. ती घटून १५ लाख टनावर आली आहे. अशा स्थितीत कारखान्याला १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत होता. त्यामुळे कारखान्याचे सीएमडी ओ. पी. धानुका यांना २३ डिसेंबर २०२० रोजी सरकारला पत्र लिहून आर्थिक अडचणींसह इतर कारणांनी कारखाना चालवण्यापासून हात वर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here