हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
देशातील ऑईल कंपन्यांनी राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना मिळून ४७ कोटी ६४ लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा कोटा जाहीर केला आहे. त्यापैकी सहकारी साखर कारखान्यांनी मार्च अखेर एकूण १३ कोटी ३६ लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. इथेनॉलच्या या मागणीमुळं साखर कारखान्यांना फायदा होणार असून, ऊस उत्पादकांची थकीत देणी भागवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
देशातील ऑईल कंपन्यांनी साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यासाठी करार केला आहे. यामुळे कारखान्यांना फायदा होणार असून, त्यांच्या खात्यात पैसे येण्यास मदत होणार आहे. देशात २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे टार्गेट केंद्राने ठेवले आहे. केवळ उसाच्या मळीपासूनच नव्हे तर, उसाचा रस, खराब धान्य, सडलेले बटाटे, मका, आणि अतिरिक्त उत्पादन झालेले धान्या यांपासून इथेनॉल तयार करण्यासाचा सरकारचा मानस आहे.
राज्यातील ७२ साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मिती क्षक्षमता ५७ कोटी १८ लाख लिटर आहे. यात सहकारी साखर कारखान्यांमध्ये ४० कोटी लिटर इथेनॉल तयार होऊ शकते. असे असले तरी सहकारी साखर कारखान्यांना केवळ २० कोट लिटर इथेनॉल पुरवण्याचाच कोटा मिळाला आहे. त्यातील ७ कोटी लिटर इथेनॉल कारखान्यांनी यापूर्वीच पुरवले आहे.