इन्कमटॅक्स रिटर्न भरताना या पाचही मार्गाने होणारी कमाई नोंदवणे गरजेचे

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाइल करण्याची अंतिम मुदत आता जवळ आली आहे. सरकारने आयटीआरची डेडलाइन वाढवली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुदतीनंतर करदात्यांना आयटीआर भरताना त्यावर दंडही भरावा लागेल. त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही आयटीआर भरला नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. यासोबतच आयटीआर भरताना छोट्या डिटेल्सवर लक्ष देणे गरजेचे आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आयटीआरमध्ये पाच प्रकारच्या उत्पन्नाचे स्रोत सांगणे अपेक्षित आहे. अन्यथा इन्कमटॅक्स विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. जर तुम्ही मुलांच्या नावे गुंतवणूक केली असेल तर त्याचा तपशील द्यावा लागतो. अल्पवयीन मुलाच्या नावे बँक अकाउंट सुरू केले असेल तर त्याची माहिती देणे अपेक्षित आहे. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न जोडल्यावर १५०० रुपयांचा कर परतावा तुम्ही मिळवू शकता. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावरील गुंतवणूक करमुक्त आहे. मात्र, आयटीआरमध्ये याची माहिती द्यावी लागेल. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती अनिवार्य आहे. सेव्हिंग्स बँक अकाउंटचे रिटर्न आयटीआरमध्ये भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर सेक्शन ८० TTA अंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतच्या डिडक्शनवर तुम्ही क्लेम करू शकता.

याशिवाय परदेशातील गुंतवणूक, जी डायरेक्ट इक्विटी होल्डिंग्स अथवा फॉरेन फंड्स किंवा हाउस प्रॉपर्टीच्या रुपात आहे, त्याची माहिती देणे गरजेचे आहे. व्याजातून मिळणारे उत्पन्न म्हणजे अॅक्युअर्ड इंटरेस्ट दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आयटीआर रिटर्न भरताना काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here