जिल्ह्यात २२०० हेक्टर ऊस क्षेत्र घटले, कारखानदार चिंतेत

सहारनपूर : जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात घट दिसून आली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा २,२५६ हेक्टर ऊस क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या हंगामात १,२१,५२५.५४४ हेक्टर ऊस क्षेत्र होते. ते आता १,१९,२६९.२८६ हेक्टर झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसमोर उसाच्या तुटवड्याचा प्रश्न असेल. गाळप क्षमता वाढल्याने उसाची पळवापळवी होईल अशी शक्यता आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस सर्वेक्षण अहवालात देवबंद साखर कारखाना कार्यक्षेत्रात नवीन ऊस लागवड १० टक्क्यांनी वाढली असली तरी खोडवा उसाचे क्षेत्र नऊ टक्के कमी झाल्याचे म्हटले आहे. गांगनौली कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नवीन ऊस लागवड दोन टक्क्यांनी वाढली आहे. सरसावा साखर कारखाना कार्यक्षेत्रात ११ टक्के, नानोतामध्ये आठ तर गागलहेडी कारखाना कार्यक्षेत्रात नऊ टक्के आणि शेरमऊ विभागात सहा टक्के नवीन ऊस क्षेत्र घटले आहे.
सरसावा, गांगनौली, टोडरपूर येथे खोडवा ऊस क्षेत्र घटले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आगामी गळीत हंगामात गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या बिडवी आणि टोडरपूर साखर कारखाने सुरू होणार आहेत. टोडरपूर कारखान्यात गळीत हंगामाची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात देवबंद, गांगनौली, गागलहेडी, शेरमऊ, नानौता आणि सरसावा हे कारखाने गळीत हंगामात भाग घेत होते. आता बिडवी आणि टोडरपूर कारखाने सुरू होत असल्याने संख्या वाढली आहे. त्यामुळे ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा असेल. यंदाच्या हंगामात दोन कारखाने नव्याने सुरू होत असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here