सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ साठी रोलर पूजन चेअरमन, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.मोहिते-पाटील यांनी कारखान्याच्या प्रस्तावित प्रतिदिन साडेपाच हजार गाळप क्षमतेच्या विस्तारीकरणाचा आढावा घेण्यात आला. आमदार मोहिते-पाटील म्हणाले कि, आगामी २०२३–२४ गळीत हंगामामध्ये कारखान्याने पाच लाख टन गाळपाचे उदिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यास कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आगामी हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस पाठविण्याचे आवाहन केले. यावेळी शिवतेजसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, बाबाराजे देशमुख, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, चंद्रकांत शिंदे, सुरेश पाटील, सुधाकर पोळ आदी उपस्थित होते.