शामली : कोईंबतूर ऊस उत्पादन संस्थेचे माजी संचालक आणि को ०२३८ प्रजातीचे जनक पद्मश्री डॉ. बक्शीराम यांनी अपर दोआब साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतीची पाहणी केली. गोहरनी गावासह सिम्भालका, झाल, सल्फा गावात शेतकऱ्यांच्या उसावर पोक्का बोईंग व इतर किडींचा फैलाव झाला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांना ऑक्सिक्लोराइड प्रती लिटर पाण्यात २ ग्रॅम मिसळून त्याची फवारणी करावी, अशाच पद्धतीने कार्बन्डेझीयमची फवारणी करावी. विविध पद्धतीने पिकाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले. काही नव्या पद्धतीचीही माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. ०२३८ प्रजातीवरील किड दिसून आल्यास अशी रोगग्रस्त रोपे उखडून टाकावीत असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. बक्शीराम यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील को १५०२३ आणि ०११८ या प्रजातीच्या उसाचीही पाहणी केली. या प्रजातींचा ऊस चांगला दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी भविष्यात याच उसाची लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी युनिट प्रमुख सुशील चौधरी, महाव्यवस्थापक बलधारी सिंह, ऊस विकास विभाग प्रमुख सी. पी. सिंह, नरेश कुमार, दीपक राणा आदी उपस्थित होते.