उपायुक्तांकडून साखर कारखान्याची पाहणी, हंगामापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश

नवाशहर : पंजाबमधील नवाशहरचे उपायुक्त नवजोत पाल सिंह रंधावा यांनी बुधवारी साखर कारखान्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी साखर कारखान्याच्या परिसरात जैविक इंधनावर आधारित विज प्लांटमधील राख हटविण्याच्या कामाचा आढावा घेतला. राखेची समस्या रोखण्यासाठी वॅट स्क्रबर लावण्याच्या कामाची पाहणी करत त्यांनी या वीज प्रकल्पाच्या व्यवस्थापकांना प्रदूषण नियंत्रणाची उपाय योजना करत तोडगा काढावा असे निर्देश दिले.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आपल्या पाहणी दौऱ्यावेळी उपायुक्त रंधावा यांनी कारखाना व्यवस्थापनाला विविध बांबीविषयी सूचना केली. हंगामादरम्यान कारखाना पूर्ण वेळ चालावा यासाठी आवश्यक कामे ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. साखर कारखान्याच्या विश्रामगृहाची पाहणी करताना त्यांनी त्याच्या सुधारणेचे, नूतनीकरणाचे निर्देश दिले. यावेळी एडीसी राजीव वर्मा, साखर काखान्याचे सरव्यवस्थापक सुरेंद्र पाल, वीज प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here