जकार्ता : इंडोनेशियाच्या पीटी पर्टेमिना (PT Pertamina) कंपनीने ऊस आणि कसावापासून बायोइथेनॉलचे उत्पादन सुरू करण्याची तयारी केली आहे. जगातील सर्वात मोठा पाम तेल बायोडिझेल वापरकर्ता देश इंधन आयात आणि कार्बन उत्सर्जनमध्ये कपात करण्यासाठी पेट्रोलियमसाठी बायोइथेनॉल जनादेश लागू करण्यासाठी काम करीत आहे.
याबाबत रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, पर्टेमिनाचे सीईओ निकी विद्यावती यांनी सांगितले की, या वर्षी आम्ही ऊस आणि कसावापासून बायो इथेनॉलचे उत्पादन करणार आहोत. यासाठी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर फीडस्टॉक आहे. त्याचा वापर अधिकाधिक केला जाऊ शकतो. ते म्हणाले की, पाम तेलापासून बायोडिझेल आणि ऊस तसेच कसावा पासून इथेनॉलचे उत्पादन केले जाणार आहे.