इर्शाळवाडी भूस्खलन: ढिगाऱ्यातून 103 जणांना वाचवण्यात यश, 12 जणांचा मृत्यू

मुंबई / रायगड रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत बुधवारी रात्री झालेल्या भूस्खलनात गावातील 25 ते 35 घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावात 100 ते 150 लोक अडकले असल्याचा प्राथमिक अंदाज बचाव पथक आणि पोलिसांनी वर्तवला आहे.

मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. एनडीआरएफ रेस्क्यू टीमसह, पॅनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन रेस्क्यू टीम, सिडको मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गटही मदतकार्यात सक्रिय आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री  दादा भुसे, अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बचाव पथकाने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आतापर्यंत 103 जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.तसेच या गावातील जे लोक कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here