बागपत : माजी आमदार तथा भाजप नेते साहब सिंह यांनी लखनौमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उसाची थकीत बिले, पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी, मोकाट गुरांचे संरक्षण करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्या लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माजी आमदार साहब सिंह यांनी सांगितले की, लखनौमध्ये त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मलकपूर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यमुना, हिंडन आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जर त्यांना भरपाई मिळाली नाही तर ते रस्त्यावर उतरतील. त्यावर उपाय योजना करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. याची सोडवणूक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.