गुजरात ते महाराष्ट्र – सर्वत्र पावसाने हाहाकार, आयएमडीकडून या राज्यांना रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली : महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दिल्लीत यमुना नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना मदत केंद्रांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. आगामी काही दिवस अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

जनसत्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गुजरातमधील जुनागढ आणि नवसारीमध्ये जोरदार पावसाने पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, अनेक कार आणि जनावरे वाहून गेली. अहमदाबाद एअरपोर्टमध्ये पाणी घुसले. एनडीआरएफची पथके अनेक जिल्ह्यांत तैनात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री भुपेद्र पटेल यांच्याशी संपर्क साधला आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या पथकांनी जुनागढमध्ये बचाव अभियान राबवले.
महाराष्ट्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे आणि रायगडसह सात जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळला. मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगितले की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो. तर पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मंगळवापासून गुरुवारपर्यंत पाऊस सुरू राहिल. मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि कर्नाटकमध्येही पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here