रावळगाव कारखान्याचे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रोलर पूजन

नाशिक : हजारो शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी रावळगाव साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास स्पायका ग्रीन एनर्जी अँड अॅग्रो प्रा.लि.च्या एस.जे.शुगर रावळगाव कारखान्याचे चेअरमन बबनराव गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी आगामी हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रोलर पूजन करण्यात आले.

गायकवाड म्हणाले, शेतकऱ्यांच्या विस्वास आणि पाठबळावर कारखाना सक्षमपणे चालविला जाईल. प्रा.के.एन.अहिरे म्हणाले कि, कारखाना सुरु करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने सुरु झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. कारखाना यशस्वीपणे चालविण्यासाठी सर्व घटकांनी प्रामाणिकपणे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संचालक कुंदन चव्हाण, प्रा. अनिल निकम, शेखर पवार, सुनील पवार, नामदेव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here