ऊस उत्पादकांकडून आतापर्यंत ५६ लाख हेक्टरमध्ये पिकाची लागवड

नवी दिल्ली : कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाने २१ जुलै २०२३ पर्यंत खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आकडेवारी जारी केली आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील शेतकऱ्यांनी यावर्षी आतापर्यंत ७३३.४२ लाख हेक्टर खरीप पिकांची पेरणी केली आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत ७२४.९९ लाख हेक्टरमध्ये पिकांची पेरणी झाली होती. वार्षिक आधारावर ही पेरणी १.१६ टक्के जादा आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५६ लाख हेक्टरमध्ये पिकाची लागवड केली आहे. तर गेल्यावर्षी ५३.३४ लाख हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली होती.

कमोडिटीनिहाय पाहिले असता, भाताची पेरणी १८०.२० लाख हेक्टरमध्ये झाली आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत १७५.४७ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती.

मात्र, उडीद, तूर, उडीद, मुग आणि कुळथीसह इतर डाळींची पेरणी दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिसून येते की, यंदा खरीप हंगामात काही डाळींची पेरणी ८५.८५ लाख हेक्टर झाली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ती ९५.२२ लाख हेक्टर होती. याशिवाय, तेलबियांची पेरणी, ज्यात भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि इतरांचा समावेश आहे, ती गतवर्षीच्या १५५.२९ लाख हेक्टरच्या तुलनेत जास्त म्हणजे १६०.४१ लाख हेक्टर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here